Cyclone In West Bengal : पश्चिम बंगाल (West Bengal)च्या जलपाईगुडी जिल्ह्यात रविवारी आलेल्या चक्रीवादळ(Cyclone)मुळे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात गारपिटीसह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे (Cyclone In West Bengal) अनेक घरांचं नुकसान झालं आहे. झाडे उन्मळून पडली आहेत. विजेचे खांब पडले गेलेत. त्याशिवाय, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या परिस्थीतीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. जखमींना दाखल केलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही त्यांनी भेट दिली. द्विजेंद्र सरकार (52), अनिमा रॉय (49), जोगेन रॉय (70) आणि समर रॉय (64) अशी मृतांची नावे आहेत. (हेही वाचा :Bageshwar Baba : बागेश्वर बाबा विरोधात गुन्हा दाखल; भंडारा जिल्ह्यात संताविषयी वादग्रस्त वक्तव्य )
#WATCH | West Bengal: Devastation in Jalpaiguri in the aftermath of the district hit by storms, yesterday. pic.twitter.com/keK3yuUPZs
— ANI (@ANI) April 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)