Bageshwar Baba : बागेश्वर बाबा विरोधात गुन्हा दाखल; भंडारा जिल्ह्यात संताविषयी वादग्रस्त वक्तव्य
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात धीरेंद्र शास्त्री म्हणजे बागेश्वर बाबा यांनी एका विशिष्ट सांप्रदायातील संतांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्या सांप्रदायातील लोकांची मने दुखावली गेली आहेत. त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात भंडारा गोंदिया जिल्हयातील आणि विविध पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल केली आहे.
Bageshwar Baba: बागेश्वर बाबा पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत सापडले आहेत. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात त्यांचा सत्संग सुरु असताना त्यांनी मानवधर्माचे संस्थापक जूमदेव ठूब्रिकर (Jumdev Thubrikar) यांच्याविरुध्द आक्षेपार्ह विधान करत टीका केली. त्यामुळे लाखो अनुयायांनी नाराजी व्यक्त केली. हजारोच्या संख्येने नागरीकांनी मोहाडी पोलिस स्टेशन गाठले. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली. धिरेंद्र शास्त्री यांच्या विरुध्द 295 कलम अन्तर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा :Nagpur Crime News : नागपूरमध्ये बनावट लग्न लावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार आरोपींना अटक )
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2024 09:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

