Sidhu Moosewala Shot Dead: आपल्या गाण्यांमधून बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन देणारे पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्या हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. मानसा येथे अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. प्रथम गंभीर जखमी झालेल्या सिद्धू मुसेवाला यांना मानसा येथील रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या हल्ल्यात आणखी दोन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राणघातक हल्ल्याच्या वेळी सिद्धू मुसेवाला स्वतः गाडी चालवत होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना मानसा जिल्ह्यात घडली. येथे अज्ञात हल्लेखोरांनी महिंद्रा स्कॉर्पिओ चालविणाऱ्या मुसेवाला यांच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी मुसेवाला यांना तात्काळ मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांना वाचवता आले नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)