Big Bazaar Fined Due To Carry Bag: ग्राहकाला न विचारता कॅरी बॅगसाठी 7 रुपये आकारणं बिग बझारला चांगलचं महागात पडलं आहे. अंबाला जिल्हा आयोगाने या प्रकरणी बिग बझारला 3 हजार रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. नीना संधू (अध्यक्ष), रुबी शर्मा (सदस्य) आणि विनोद कुमार शर्मा (सदस्य) यांचा समावेश असलेल्या जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग, अंबाला (हरियाणा) खंडपीठाने सेवांमध्ये झालेल्या कमतरतेसाठी बिग बाजारला जबाबदार धरले. अतिरिक्त शुल्कासाठी तक्रारदाराला पुरेशी माहिती न देता कॅरी बॅगसाठी आकारलेले 7 रुपये ग्राहकाला खंडपीठाने परत करण्याचे आणि 3 हजार रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले. (हेही वाचा - Noida Viral Wedding: Mercedes E-class, 1.25 किलो सोने, 7 किलो चांदी...; नोएडातील लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, Watch Video)
Charging Rs. 7 For Carry Bag Without Adequately Notifying Customers, Ambala District Commission Directs Big Bazaar To Pay Rs. 3k Compensation https://t.co/vMIk3Rt7Bv
— Live Law (@LiveLawIndia) February 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)