EAM Jaishankar Blasts Canada: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (EAM Jaishankar) यांनी खलिस्तानी अतिरेक्यांच्या मुद्द्यावरून भारत-कॅनडा वादावर पुन्हा वक्तव्य केलं आहे. दहशतवादी आणि उघडपणे हिंसेचे समर्थन करणार्या लोकांबद्दल कॅनडाची परवानगी देणारी वृत्ती असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जेक सुलिव्हन आणि परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याशी भारत-कॅनडा राजनैतिक वादावर चर्चा केली. जयशंकर यांनी गुरुवारी अँटोनी ब्लिंकन आणि जेक सुलिव्हन यांची भेट घेतली. यावेळी परराष्ट्र मंत्री म्हणाले, आज मी प्रत्यक्षात अशा परिस्थितीत आहे की, माझे राजनयिक कॅनडामधील दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात जाण्यासाठी असुरक्षित आहेत. त्यांना सार्वजनिकरित्या घाबरवले जाते. यामुळे मला कॅनडामधील व्हिसा ऑपरेशन्स तात्पुरते स्थगित करण्यास भाग पाडले आहे.
VIDEO | "We consider there's a permissive Canadian attitude to terrorists and people who openly advocate violence. They have been given operating space in Canada because of Canadian politics. For us, it is certainly been a country where organised crime from India mixed with… pic.twitter.com/2rlRUEPHmi
— Press Trust of India (@PTI_News) September 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)