Bengaluru Shocker: बेंगळुरूमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नेलमंगला टोल प्लाझाजवळ एका खासगी रुग्णवाहिका (Ambulance)चालकावर मद्यधुंद दुचाकीस्वाराने हल्ला केल्याची एका धक्कादायक घटनासमोर आली आहे. विशेष म्हणजे, या घटनेवेळी पाच महिन्यांचे ऑक्सिजनवर असलेले बाळ(Baby) तो रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. रुग्णवाहिका तुमाकुरू येथील एका खाजगी रुग्णालयापासून बेंगळुरूच्या वाणी विलास रुग्णालयाकडे जात होती. या घटनेवेळी पोलिस( Police)ही तेथे असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. मद्यधुंद दुचाकीस्वार(Drunk Biker) रुग्णवाहिकेच्या खिडकीतून ड्रायव्हरला बाहेर खेचत होता. रुग्णवाहिकेचा चालक विनाव्यत्यय पुढे जाण्याची परवानगी मिळावी यासाठी दुचाकीस्वाराकडे विनवणी करत होता. मात्र, मद्यधुंद दुचाकीस्वाराने त्यांच्या विनवणीकडे दुर्लक्ष केले.

पोस्ट पाहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)