Accident News : तमिळनाडूमधील विरुधुनगर-मदुराई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने आधी दुचाकीला धडक दिली, नंतर कारचे मागचे चाक दुभाजकाला धडकल्याने कार स्पीडमध्ये असतानाच तीन वेळा हवेत पलटी होऊन रस्त्याच्याकडेला आदळली. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. (हेही वाचा: Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची जोरदार धडक; कारचा चक्काचूर)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)