Death By Heart Attack:  बदलत्या वातावरणामुळे आणि रोजच्या धावपळीमुळे तरुणांमध्ये ह्रदयविकाराचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान काल उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मिठाईच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. मिठाईच्या दुकानात काम करताना अचानक, तो जमिनीवर कोसळला. त्याला कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले परंतु पोहचण्याच्या आधीच त्याचा मृत्यू ह्रदयविकाराने झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)