IIT Kanpur- Heart Attack While Giving Speech: आयआयटी कानपूरच्या मंचावर भाषण देताना हृदयविकाराचा झटका आल्याने शास्त्रज्ञ Sameer Khandekar यांचे निधन
भाषणादरम्यान वेदना होत असल्याने ते मंचावर बसले. बराच वेळ लोकांना वाटलं की समीर भावूक झाले. पण त्यानंतर ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
IIT Kanpur- Heart Attack While Giving Speech: मृत्यूसाठी जागा किंवा वेळ नाही. ती आपल्या आयुष्यात कधी प्रवेश करेल हे कोणीही सांगू शकत नाही. तुम्ही वाचत असलेल्या पहिल्या ओळी कानपूर आयआयटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. समीर खांडेकर (Scientist Sameer Khandekar) यांना लागू होतात. शुक्रवारी (22 डिसेंबर) IIT कानपूर येथे माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) त्यांचे निधन झाले. भाषणादरम्यान वेदना होत असल्याने ते मंचावर बसले. बराच वेळ लोकांना वाटलं की समीर भावूक झाले. पण त्यानंतर ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या सगळ्यात खेदाची गोष्ट म्हणजे हा अपघात झाला तेव्हा ते आरोग्यावर भाषण देत होते. त्याचे शेवटचे शब्द होते... आरोग्याची काळजी घ्या. असे म्हणताच त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले. (हेही वाचा - Heart Attack Risk: हृदयविकाराच्या झटक्याचा सोमवारी सर्वाधिक धोका; नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा)
IIT कानपुर में मंच पर बोलते-बोलते वैज्ञानिक समीर खांडेकर की मौत हुई
◆ प्रोफेसर के आखिरी शब्द थे, "अपनी सेहत का ध्यान रखें"
◆ जब वे गिरे तो लोगों को लगा कि वे भावुक हो गए हैं, इसलिए बैठ गए
Sameer Khandekar | #SameerKhandekar | IIT Kanpur pic.twitter.com/KUYal15B1Y
— News24 (@news24tvchannel) December 23, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 23, 2023 01:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

