Delhi Rain: रात्रभरापासून दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले आहे. दिल्लीत मुसळधार पावसामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल 1 चा छत कोसळली. तर आज दुपारी शहरातील मलका गंज येथील परिसरातील हंसदाज कॉलेजवळ एक कार खड्ड्यात बुडाली आहे. मुसळधार पावसाने या घटना होत आहे. हा खड्डा मेट्रोसाठी खोदण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले. कार खड्ड्यात बुडाली असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.  क्रेनच्या सहाय्याने गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (हेही वाचा-  कारची स्कूल बसला धडक, 3 विद्यार्थी जखमी, घटना CCTV कैद)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)