Mumbai Woman Molested On Bridge: मुंबईतील कुर्ला परिसरातून एका तरुणाला रेल्वे पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीने ब्रीजवर एका ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला. हे उपस्थित रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पाहिलं, आरोपीला घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिस हवालदारांनी पकडले. गणेश बेलसे (२८) असं आरोपी तरुणाचे नाव आहे, ANIने या संदर्भात माहिती दिली  आहे. आरोपीवर महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)