'CID' मधील 'Fredricks' अर्थात अभिनेता दिनेश फडणीसच्या हार्ट अटॅकचे वृत्त अफवा असल्याची माहिती co-star Dayanand Shetty ने दिली आहे. मात्र दिनेश सध्या हॉस्पिटल मध्ये असून त्यांचे यकृत निकामी झाले आहे. त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मालाड मधील तुंगा हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल केल्याचं Pinkvilla शी बोलताना दयानंद शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. 1998 मध्ये टेलिव्हिजनवर आलेली 'सीआयडी' मालिका अनेक वर्ष रसिकांच्या मनावर राज्य करत होती.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)