Sky Force: अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'स्काय फोर्स'चा ट्रेलर आज, 5 जानेवारी 2025 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट भारताच्या पहिल्या आणि सर्वात धोकादायक हवाई हल्ल्याच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २४ जानेवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्काय फोर्स'मध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत वीर पहारियाही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. संदीप केवलानी आणि अभिषेक अनिल कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओजच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात आला आहे. देशभक्ती आणि अॅक्शन चा अनोखा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमारने आपल्या सोशल मीडियावर ट्रेलर रिलीजची माहिती देताना भारताच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणादायी कहाणी असल्याचे म्हटले आहे. चाहत्यांमध्ये 'स्काय फोर्स'बद्दल प्रचंड उत्सुकता असून आज ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाची क्रेझ आणखी वाढण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: शाहिद कपूरच्या ॲक्शन थ्रिलर 'देवा'चा टीझर उद्या रिलीज होणार, चित्रपट 31 जानेवारीला थिएटरमध्ये होणार दाखल
'स्काय फोर्स'चा ट्रेलर आज होणार प्रदर्शित
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)