Ram Mandir Song Released: सध्या अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण देशात याबाबत उत्साह दिसून येत आहे. येत्या 22 जानेवारी 2024 रोजी मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन केली जाईल. अशात अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त एक गाणे तयार केले जात आहे व नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. माजी आमदार आणि भाजपचे प्रवक्ते अतुल शहा यांच्या हस्ते आज मुंबईत या गाण्याचा टीजर रिलीज करण्यात आला. राम मंदिराचा अभिषेक सोहळा हा जगभरातील हिंदूंसाठी आनंदाचा क्षण आहे. हा आनंद या गाण्यातही दिसून येत आहे. हे गाणे मराठीमध्ये असून अतुल शहा यांनी त्याची निर्मिती केली आहे. गीत मोहन सामंत यांचे असून संगीत दत्ता शिंदे यांचे आहे. (हेही वाचा: राममंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येला जाणाऱ्या भक्तांसाठी खुशखबर! भारतीय रेल्वे 19 जानेवारीपासून चालवणार 1,000 स्पेशल गाड्या)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)