Netflix च्या इंद्राणी मुखर्जी वरील ' द इंद्राणी मुखर्जी स्टोरी- बरीड ट्रूथ' वेब सीरीज वर मुंबई उच्च न्यायालयाने तात्पूर्ती बंदी घातली आहे. उद्या (23 फेब्रुवारी)  या वेब सीरीजचे स्क्रिनिंग केले जाणार नाही. या सीरीजचं आधी सीबीआय अधिकार्‍यांसमोर स्क्रिनिंग करा असे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी 29 फेब्रुवारी दिवशी आहे. सीबीआयच्या दाव्यानुसार या सीरीजचा प्रकरणाच्या तपासावर प्रभाव होऊ शकतो. लोकांच्या मनातही गैरसमज निर्माण होऊ शकतात. दरम्यान इंद्राणी मुखर्जी ही शीना बोरा मर्डर केस मधील आरोपी असून सध्या ती जामीनावर बाहेर आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)