आजच्या काळात टॅलेंट असलेल्या लोकांसाठी सोशल मीडिया एक वरदान आहे. हे एक असे व्यासपीठ आहे, जिथे एखादी व्यक्ती सहजपणे आपली प्रतिभा सर्वांसमोर ठेवू शकते. ज्यांनी यूट्यूब, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा योग्यरीतीने वापर केला आहे, अशा अनेक प्रतिभावंतांना यश मिळाले आहे. इंस्टाग्रामवर चांदनी नावाची एक प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट सध्या चर्चेत आहे. चांदनी बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टची खूप चांगल्या प्रकारे नक्कल करते. चांदनीचा आवाजही आलियासारखा आहे. आता चांदनीने आलियाच्या ब्रह्मास्त्र चित्रपटातील भूमिकेची नक्कल केली आहे. चित्रपटात आलिया भट्ट ज्या पद्धतीने बोलत आहे, हावभाव करत आहे चांदनीने अगदी हुबेहूब वठवले आहे. जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल, तर तुम्ही निश्चितपणे या रीलशी रिलेट करू शकाल. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, तुम्ही तो पाहिल्यास नक्कीच पोट धरून हसाल.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)