अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay)च्या 'लियो' (Leo) या आगामी चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित 'लियो' उद्या अर्थात 19 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टायटलवरुन हा वाद सुरू झाला होता. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे प्रकरण न्यायालयात पोहोचताच प्रकरण मिटवले असून चित्रपट आता ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होणार आहे. निर्मात्याने 'लिओ'चे तेलुगू टायटल जीएसटीसोबत तब्बल 26.5 लाख रुपये देत विकत घेतल्याचे वृत्त आहे. त्यानंतर हे प्रकरण संपले असून चित्रपटाचे तेलुगू व्हर्जनही 19 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
पाहा पोस्ट -
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)