बॉलिवूड आणि गुजराती चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेते टिकू तलसानिया यांना शनिवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 70 वर्षीय टिकू तलसानिया यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना हृदयविकाराचा मोठा झटका आल्याचे तपासात समोर आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अभिनेत्याच्या उपचाराबाबत इतर तपशील येणे बाकी आहे. त्यांची ज्येष्ठता आणि लोकप्रियता लक्षात घेऊन सर्वजणच ते लवकरात लवकर बरे होण्याबद्दल प्रार्थना करत आहेत. टिकू तलसानिया यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. त्यांनी 1984 मध्ये लोकप्रिय टीव्ही शो 'ये जो है जिंदगी'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी 1986 मध्ये 'प्यार के दो पल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. (हेही वाचा: Pritish Nandy Passes Away: पत्रकार, फिल्ममेकर प्रीतीश नंदी यांचे निधन; अभिनेते अनुपम खेर यांनी शेअर केली दु:खद बातमी)
Tiku Talsania Heart Attack:
Veteran Bollywood actor Tiku Talsania, renowned for his iconic comic roles, has reportedly suffered a massive heart attack. The 70-year-old is currently undergoing treatment at Kokilaben Dhirubhai Ambani Hospital in Mumbai.
Sources confirm the news, with reports indicating that… pic.twitter.com/azGYOThRUp
— Mid Day (@mid_day) January 11, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)