सिनेरसिसांची मने जिंकणारा आणि ऑस्करला गवसणी घालणाऱ्या द एलिफेंट व्हिस्परर्स माहितीपटातील कलाकारांचे जोरदार कौतुक केेल जात आहे. या जोडप्याचे विमान प्रवासातही विशेष स्वागत करण्यात आले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.

द एलिफंट व्हिस्परर्स हा एक जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहणारा माहितीपट आहे. हा चित्रपट तामिळनाडूतील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्ती कॅम्पमधील बोमन आणि बेली या आदिवासी जोडप्याच्या जीवनाचे दर्शन घडवतो. जे दोन हत्तींचे पालनपोषण करतात आणि त्यांची काळजी घेतात. द एलिफंट व्हिस्परर्स, कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित आणि सिख्या एंटरटेनमेंटच्या गुनीत मोंगा निर्मित, नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)