भारताचा माजी क्रिकेटर शिखर धवन आणि बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंवरून शिखर धवन आणि हुमा कुरेशी एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे. शिखर धवन हुमा कुरेशीला डेट करत आहे का? हा प्रश्न सोशल मीडियावर चर्चेत आहे. एका फोटोमध्ये हुमा कुरेशीने लाल रंगाचा लेहेंगा घातला आहे, तर शिखर धवनने शेरवानी घातली आहे. त्यावरून दोघांनी लग्न केल्याचेही बोलोले जात आहे. तर सत्य हे आहे की, हे फोटो खोटे आहेत. जसे सानिया मिर्झाचे मोहम्मद शमीसोबतचे फोटो एआयने तयार केले होते, त्याचप्रमाणे आता शिखर धवन आणि हुमा कुरेशीचे फोटोही एआयने तयार केले आहेत. म्हणजेच हे फोटो पूर्णपणे खोटे असून, ते एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले गेले आहेत.

शिखर धवन किंवा हुमा कुरेशी या दोघांनीही एकमेकांसोबत कोणत्याही रोमँटिक सहभागाची जाहीरपणे कबुली दिली नाही आणि त्यांच्या प्रतिनिधींनी या अफवांचे स्पष्टपणे खंडन केले आहे. धवन आणि कुरेशी यांनी 2022 च्या बॉलीवूड चित्रपट डबल XL मध्ये एकत्र काम केले होते. यामध्ये धवनने विशेष छोटी भूमिका साकारली होती. टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवनने गेल्या वर्षी पत्नी आयेशा मुखर्जीला घटस्फोट दिला होता. तर हुमा कुरेशी अभिनय प्रशिक्षक रचित सिंगला डेट करत असल्याची चर्चा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हे जोडपे सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात एकत्र दिसले होते. (हेही वाचा: "फ्रान्सची 107 वर्षे जुनी द्राक्ष बाग तुझ्यासाठी भेट असणार", Sukesh Chandrashekhar ने तिहार तुरुंगातून Jacqueline Fernandez ला लिहिले प्रेमपत्र, नाताळला दिली अनोखी भेट!)

माजी क्रिकेटर शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांचे खोटे फोटो व्हायरल-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)