पठाणनंतर (Pathaan) किंग खान त्याच्या आगामी 'जवान' (Jawan) चित्रपटामुळे चर्चेत आहे. यापूर्वी या चित्रपटाच्या टीझरच्या बातम्या येत होत्या. चित्रपटाचा टीझर 7 जुलै किंवा 15 जुलै रोजी रिलीज होऊ शकतो, असे बोलले जात होते, परंतु आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. पठाणच्या रिलीज डेटनंतर आता शाहरुख खानचे चाहते त्याच्या जवान या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाचा टीझर नाही तर थेट ट्रेलर रिलीज होणार आहे. होय, या चित्रपटाचा दमदार ट्रेलर 12 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. 12 जुलै रोजी जवान या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 'मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग पार्ट वन'सोबतच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या बातमीने चाहते खूप खुश दिसत आहेत. दरम्यान, जवान रिलीज होण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच त्याचे प्रमोशन सुरू होणार असल्याचीही बातमी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)