Anant Ambani and Radhika Merchant Sangeet Ceremony: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शुक्रवारी संगीत सोहळा मोठा थाटामाटात साजरा केला. या सोहळ्यात कलाकारांनी आपली जादू दाखवत जोरदार परफॉर्मन्स दिले. त्यात बॉलिवूडचा सर्वांचा लाडका सल्लू भाऊने (Salman Khan) शानदार परफॉर्मन्स दिला आहे. अनंत अंबानी सोबत सलमान खाने  'ऐसा पहली बार हुआ है' गाण्याच्या आयकॉनिक स्टेप्स सादर केले. सलमानच्या डान्समुळे प्रेक्षकांना भुरळ घातली आणि तो क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय बनला. हा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनंत आणि सलमानने एटीव्ही बाईकमध्ये दमदार एन्ट्री केली. मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे शुक्रवारी अनंत आणि राधिका यांच्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती दाखवली. (हेही वाचा-  मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा नातवंडांसोबतचा हृदयस्पर्शी व्हिडीओ; अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातील खास क्षण (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)