भारतीय मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. 58 वर्षीय राजू यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात जवळपास 40 दिवस दाखल करण्यात आले होते. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील एका हॉटेलमधील जिममध्ये व्यायाम करताना राजू कोसळले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. आज त्यांचा मृत्यू झाला. आता राजू श्रीवास्तव यांचे शवविच्छेदन आभासी शवविच्छेदन (Virtual Autopsy) या नवीन तंत्राने करण्यात आले आहे. त्यासाठी कोणत्याही विच्छेदनाची गरज नाही. संपूर्ण प्रक्रियेला 15 ते 20 मिनिटे लागली, त्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. एम्सचे प्रमुख डॉ सुधीर गुप्ता, फॉरेन्सिक मेडिसिन विभाग यांनी ही माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)