प्रथमेश परबने गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘होय महाराजा’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता होती. अशातच आता या हटक्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. 'होय महाराजा'च्या ट्रेलरला सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळत आहे. कॉमेडी कथानक असलेल्या या चित्रपटात रमेशची लव्हस्टोरी सर्वाधिक चर्चेची असेल. चित्रपटात नेमकी कशी कॉमेडी खुलते हे ट्रेलर पाहिल्यावर कळेल. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रथमेश परबसह, अंकिता लांडे, अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, समीर चौघुले, वैभव मांगले असे एका पेक्षा एक अफलातून विनोदवीर चित्रपटात दिसणार आहेत.
पाहा ट्रेलर -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)