बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश चंद्र कौशिक (Satish Chandra Kaushik Passes Away) यांचे निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या या निधनाने बाॅलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. मोठ्या कलाकार पासुन ते राजकीय नेते शोक श्रद्धांजली वाहत आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले, प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक व हास्य अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. एक मनस्वी कलाकार आणि विचारशील दिग्दर्शक असलेल्या सतीश कौशिक यांनी आपल्या सशक्त अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरले. जवळपास चार दशके त्यांनी केलेली चित्रपट व रंगभूमीची सेवा कधीही विसरली जाणार नाही. श्री कौशिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)