Kaam Chalu Hai Trailer: बॉलिवूड चित्रपटातील अभिनेता राजपाल यादव याचा आगामी चित्रपटाचा ट्रेलर लॉच रिलीज झाला आहे. काम चालू है या चित्रपटात मुख्य भुमिकेत अभिनेता राजपाल यादव दिसणार आहे. हा चित्रपट  19 एप्रिल 2024 रोजी ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, राजपाल यादव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपल्या मुलीला गमावतो, ज्याच्या विरोधात तो प्रशासनाशी लढतो आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम करतो. चित्रपटात राजपाल यादव यांच्या सोबत जिया मानेक आणि कुरंगी नागराज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन पलाश मुच्छाळ यांनी केले आहे. बेसलाइन स्टुडिओ आणि पाल म्युझिक अँड फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. सर्वांना व्याकुळ करणारं असा चित्रपटाचा ट्रेलर आहे. (हेही वाचा- लव्ह यू शंकर' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)