Luv You Shankar Trailer: श्रेयस तळपदे आणि तनिषा मुखर्जी यांचा लव यू शंकर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये दिसल्याप्रमाणे, श्रेयस तळपदे एका सामान्य व्यक्तीच्या भूमिकेत आहे. तो भगवान शिवाचा भत्क आहे. तनिषा मुखर्दी या चित्रपटात श्रेयस यांच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री चांगलीच दिसतेय. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव एस. रुईया यांनी केले आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे आणि तनिषा मुखर्जीशिवाय संजय मिश्रा, इलाक्षी गुप्ता, अभिमन्यू सिंग, हेमंत पांडे, मास्टर मान गांधी आणि प्रतीक जैन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा- सुबोध भावेनं शेअर केलं "संगीत मानापमान"चं पहिलं पोस्टर)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)