देशासह परदेशातही सुपरस्टार रजनीकांतची क्रेझ आहे. जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. हे चाहते रजनीकांतच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी, बेंगळुरू, चेन्नईच्या अनेक कंपन्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना मोफत तिकिटे देण्यात आली आहे. आता रजनीकांतच्या चाहत्यांनी 'जेलर' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी संपूर्ण चेन्नई शहरात त्याचे पोस्टर्स चेन्नईभर लावले आहेत. या चित्रपटात रजनीकांत तसेच जॅकी श्रॉफ, शिवा राजकुमार, सुनील, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, मायर्ना मेनन, योगी बाबू आणि विनायकन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. (हेही वाचा: Pushpa 2 New Poster: 'पुष्पा-2' चं नवं पोस्टर रिलीज; फहाद फासिलचा रावडी लूक)
#WATCH | Tamil Nadu | Fans of superstar Rajinikanth put up his posters across Chennai, ahead of the release of his film 'Jailer' pic.twitter.com/B33jjJJweQ
— ANI (@ANI) August 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)