Pushtaini Trailer:  ह्रतिक रोशन प्रस्तुत आणि विनोद रावत दिग्दर्शित पुश्तैनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपटा येत्या 21 जून रोजी संपूर्ण भारतभर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव झळकणार आहे. या चित्रपटाची सहलेखिका रीता हीर असून त्या देखील चित्रपटात मुख्य भुमिकेत झळकणार आहे. चित्रपटाची निर्मीती लोटस डस्ट पिक्चर्स आणि विन रॉ फिल्म यांनी केली आहे. सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. चाहत्यांनी ट्रेलर पाहून कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहले आहे की, हा चित्रपट खूप मनोंरजक असणार आहे. चाहत्यांनी चित्रपटासाठी उत्सुकता दाखवली आहे.  (हेही वाचा- सोनाक्षी सिन्हा लवकरच अडकणार लग्न बंधनात, मुंबईतील हॉटेलमध्ये पार पडणार कार्यक्रम)

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)