Big Cash Poker: हिंदू जनजागृती समिती या उजव्या विचारसरणीच्या हिंदू संघटनेने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बिग कॅश पोकरचे मालक अंकुर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले आहे. ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर सिद्दिकी जाहिरातीद्वारे पोलिसांची प्रतिमा डागाळत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश परिधान करून जुगार खेळण्याचा प्रचार करणारी धक्कादायक जाहिरात 'बिग कॅश पोकर' या ऑनलाइन ॲपद्वारे केली आहे. जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना अटक करणे हे ज्या पोलीस खात्याचे काम आहे, त्याच पोलीस खात्याचा गणवेश घालून अशी जाहिरात करणे हे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा डागाळणारे आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाने या जाहिरातीचा तीव्र निषेध केला आहे. अशा घटनांची दखल न घेतल्यास भविष्यात महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशाचा जाहिरातींमध्ये गैरवापर इतर बेकायदेशीर आणि अनैतिक कामांसाठी होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. बिग कॅश पोकर ॲपवर महाराष्ट्र पोलिसांकडून तातडीने आणि कठोर कारवाई करण्याची मागणी सुराज्य अभियानाने केली आहे. (हेही वाचा: Ekta Kapoor आणि Shobha Kapoor यांची POCSO कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांकडून चौकशी)
नवाजुद्दीन सिद्दीकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी-
.@SurajyaCampaign demands action against actor Nawazuddin Siddiqui for defaming the police in an online poker advertisement, 'Big Cash Poker'.
👉 Ideally such a demand should never come through Public.
👉The Police are expected to take action against the concerned proactively.… https://t.co/65O67t6o6R pic.twitter.com/GwpjFN3kZW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)