Prachi Pisat's Post: ‘खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...'; ज्येष्ठ अभिनेत्याने मराठी अभिनेत्री प्राची पिसाटला पाठवले आक्षेपार्ह संदेश, स्क्रीनशॉट्स उघड
या संदेशांमध्ये सुदेश यांनी प्राचीला तिचा फोन नंबर मागितला आणि तिच्याशी फ्लर्ट करण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे अनेकांनी त्यांच्या वर्तनावर संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. टीव्ही अभिनेत्री प्राची पिसाट हिने ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांनी तिला आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचा खुलासा केला आहे. प्राचीने तिच्या सोशल मीडिया खात्यावर सुदेश यांनी पाठवलेल्या संदेशांचे स्क्रीनशॉट शेअर करत हा प्रकार उघड केला, ज्यामुळे मराठी मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. या संदेशांमध्ये सुदेश यांनी प्राचीला तिचा फोन नंबर मागितला आणि तिच्याशी फ्लर्ट करण्याची इच्छा व्यक्त केली, ज्यामुळे अनेकांनी त्यांच्या वर्तनावर संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.
प्राचीने शेअर केलेल्या संदेशांच्या स्क्रीनशॉट्समध्ये, सुदेश यांनी प्राचीला तिचा नंबर पाठवण्याची विनंती केली, तसेच ‘खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...वाह’, ‘तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय’, असे लिहिल्याचे दिसून येते. प्राचीने याबाबत आवाज उठवल्यानंतर, अनेकांनी प्राचीच्या या धाडसी पावलाचे कौतुक केले. तिच्या या पोस्टला हजारो प्रतिक्रिया मिळाल्या. प्राचीच्या या खुलाशाने मराठी सिनेसृष्टीत महिलांच्या सुरक्षिततेचा आणि व्यावसायिक वर्तनाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. (हेही वाचा; Wildlife Meat Consumption: Laapata Ladies चित्रपटातील अभिनेत्री Chhaya Kadam विरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याशी शक्यता; वन्यजीव मांस सेवन केल्याच्या आरोपावरून PAWS ने लिहिले पत्र)
Prachi Pisat's Post:
Women's Helpline:
राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाईन नंबर- 1800-180-5220
महाराष्ट्र राज्य महिला आयोग - (०२२) २६५९२७०७
महाराष्ट्र राज्य महिला आयोग हेल्पलाईन नंबर- १५५२०९
हिंंसाचार प्रकरणी तक्रार - 7827170170
Women Helpline Number - 112
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2025 07:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

