‘फ्रीडम अॅट मिडनाइट’  या राजकीय थरारनाट्यामध्ये मलिष्का मेन्डोसा सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे, राजेश कुमार लियाकत अली खान यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर केसी शंकर व्ही.पी. मेनन यांची भूमिका साकारणार आहे. स्वातंत्र्यचळवळीच्या काळामध्ये सरोजिनी नायडू, व्हीपी मेनन आणि लियाकत अली खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या चळवळीमधील एक ठळक स्त्री नेतृत्व असलेल्या नायडू यांनी भारताच्या मुक्ततेचा पुरस्कार केला तसेच त्या आपल्या कवितांसाठी तसेच आंदोलनातील सहभागासाठीही ओळखल्या जातात. मेनन यांनी घटनात्मक सल्लागार म्हणून संस्थानांना स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्याच्या कामी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मुहम्मद अली जिना यांचे जवळचे सहकारी लियाकत हे फाळणीच्या वाटाघाटींमधील एक महत्त्वाचे नेते होते मात्र पंतप्रधान म्हणून त्यांना विदारक शेवटाला सामोरे जावे लागले. यातील प्रत्येक व्यक्तीमत्त्वाने भारत आणि पाकिस्तानच्या राजकीय पटलावर कधीही न मिटणारा ठसा उमटवला आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Malishka / MumbaiKiRani (@mymalishka)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)