Defamation Notice to Kangana Ranaut: अभिनेत्रीनंतर राजकारणी बनलेली कंगना रणौत विविध कारणांनी चर्चेत राहत असते. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे कंगना कायदेशीर अडचणीत सापडली आहे. राहुल गांधी यांचा टोपी घातलेला फोटो शेअर केल्याबद्दल, कंगना राणौतला 40 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. नुकतेच कंगना रणौतने संसदेत जात जनगणनेवर केलेल्या वक्तव्यावरून गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर कंगनाने राहुल गांधींचे एक बनावट छायाचित्र शेअर केले, ज्यामध्ये राहुल गांधी टोपी घातलेले, गळ्यात क्रॉस आणि कपाळावर हळद आणि सिंदूर लावलेले दिसत आहेत. कंगनाने हा फोटो तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.
राहुल गांधींवरील या मीममुळे कंगनाला नेटिझन्सने जोरदार फटकारले होते आणि आता सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील नरेंद्र मिश्रा यांनी यासाठी अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. मिश्रा म्हणाले की, आयटी कायद्यानुसार एखाद्याचा फोटो संपादित करणे आणि त्याच्या परवानगीशिवाय तो इंटरनेटवर शेअर करणे बेकायदेशीर आहे. यानंतर त्यांनी कंगनावर 40 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करून नुकसान भरपाई मागितली आहे. (हेही वाचा: Ram Gopal Yadav On Instagram Reels: 'लोक असे कपडे घालतात की नजर खाली करावी लागते'; राम गोपाल यादव यांनी संसदेत व्यक्त केली अश्लीलता आणि ऑनलाइन गेमिंगबाबत चिंता)
पहा पोस्ट-
Breaking
A famous lawyer from the Supreme Court filed a defamation case of 40 crores against Kangana Ranaut for editing and posting Rahul Gandhi's picture on Instagram. pic.twitter.com/EuPZ3W566N
— Venisha G Kiba (@KibaVenisha) August 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)