Virat Kohli-Anushka Sharma Blessed With Baby Boy: क्रिकेटर विराट कोहली पुन्हा एकदा पिता झाला आहे. त्याची पत्नी अनुष्का शर्माने एका मुलाला जन्म दिला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून विराटने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी आपल्या बाळाचे नाव अकाय (Akaay) ठेवले आहे. अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारी रोजी बाळाला जन्म दिला. विराटने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत म्हटले आहे, 'अत्यंत आनंदाने आम्ही आनंदाची बातमी देत ​​आहोत की, 15 फेब्रुवारी रोजी आमच्या घरी मुलाचा आणि वामिकाचा धाकटा भाऊ अकायचा जन्म झाला. यावेळी आम्हाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत.' अहवालानुसार विराट आणि अनुष्का सध्या लंडनमध्ये आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे 11 डिसेंबर 2017 रोजी लग्न झाले. हे लग्न इटलीतील टस्कनी येथे एका इंटिमेट सोहळ्यात पार पडले. लग्नाच्या तीन वर्षानंतर 11 जानेवारी 2021 रोजी या जोडप्याने एका मुलीचा जन्म दिला. (हेही वाचा: Hardik Pandya Training: हार्दिक पांड्याचा आयपीएलपूर्वी जोरदार सराव, दुखापतीनंतर पुनरागमन करण्यासाठी मेहनत, पाहा व्हिडिओ)

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)