'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही काळापासून ती तिचे वैयक्तिक आयुष्य आणि तिचा माजी पती आदिल दुर्रानीसोबत घटस्फोटामुळे चर्चेत आहे. काही काळापूर्वी आदिलने राखीवर आरोप करत केस दाखल केली होती. आदिलने सांगितले की, राखीने त्याचे वैयक्तिक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक केले आहेत. याप्रकरणी आता राखीला सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राखीचे वकील अली काशिफ खान यांनी सांगितले की, अभिनेत्रीला 29 नोव्हेंबर रोजी अंतरिम संरक्षण देण्यात आले आहे. आदिलने दाखल केलेल्या एफआयआरविरोधात राखीला हे संरक्षण देण्यात आले आहे. राखीने आदिलवर मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते, त्यानंतर आदिलला तुरुंगात जावे लागले होते. मात्र, तो बाहेर आला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने राखीवर अनेक आरोपही केले. (हे देखील वाचा: Randeep Hooda Marriage Video: अभिनेता रणदीप हुड्डाने बांधली गर्लफ्रेंड Lin Laishram शी लग्नगाठ; मणिपुरी रितीरिवाजानुसार पार पडला विवाहसोहळा (Watch)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)