बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव, एक दिग्गज अभिनेते आशिष विद्यार्थी पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले आहे. आशिष यांनी आसामच्या रुपाली बरुआसोबत लग्नगाठ बांधली आहे. काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचे बोलले जात आहे. रुपाली फॅशनच्या व्यवसायाशी निगडीत आहे. रुपाली बरुआ या आसाममधील गुवाहाटी येथील रहिवासी आहेत. त्यांचे कोलकात्यात फॅशन स्टोअर आणि स्वतःचा व्यवसाय आहे. आशिषच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह 11 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (हेही वाचा: Soha Ali Khan Wishes Hubby Kunal Kemmu: सोहा अली खानने पती कुणाल खेमूच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला मोहक व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)