Allu Arjun Bail: तेलंगणा उच्च न्यायालयाने (Telangana High Court) संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जूनला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आज दुपापी त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती आणि या प्रकरणाबाबत त्याची चौकशी करण्यात आली होती. अल्लू अर्जुनच्या वकीलाने सांगितले की, 'पोलिसांच्या निर्देशांमध्ये असे काहीही नव्हते की अभिनेत्याच्या आगमनामुळे कोणीही मरू शकेल. कलाकारांनी त्यांच्या चित्रपटांच्या पहिल्या शोला हजेरी लावणे सामान्य गोष्ट आहे. तथापी, सुनावणीदरम्यान, वकिलाने शाहरुख खानविरुद्ध गुजरात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचा हवाला दिला.
अल्लू अर्जुनला जामिन मंजूर -
🚨 BIG BREAKING NEWS
Pushpa movie star 'Allu Arjun' has been granted Interim Bail by Telangana High Court 🔥
JUSTICE done...! 🙏 pic.twitter.com/mUyOGdJrQJ
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) December 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)