Akshay Kumar's Donation to Haji Ali Dargah: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या औदार्यासाठी ओळखला जातो. अक्षय कुमारने वेळोवेळी अनेक ठिकाणी सढळ हाताने मदत केली आहे. आता अक्षयने मुंबईच्या हाजी अली दर्ग्याच्या कामात हातभार लावला आहे. बॉलीवूड सुपरस्टार पद्मश्री अक्षय कुमारने हाजी अली दर्ग्याच्या नूतनीकरणाच्या कामासाठी 1,21,00,000 ची मदत केली आहे. दर्ग्याच्या नूतनीकरणाच्या खर्चाची जबाबदारी त्याने उदारपणे स्वीकारली. एका 'एक्स' वापरकर्त्यांकडून याचा दावा केला जात आहे.
अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट 'खेल खेल में' रिलीज होण्यापूर्वी मुंबईतील हाजी अली दर्ग्यात पोहोचला. येथे त्याने चादर अर्पण केली आणि आपला चित्रपट हिट व्हावा यासाठी प्रार्थना केली. दिलेल्या देणगीबाबत दर्गा मॅनेजमेंट ट्रस्टने याबद्दल अक्षय कुमारचे आभार मानले आणि त्याच्या दिवंगत पालकांसाठी प्रार्थना केली. याचा एक व्हिडिओही सोशल मिडियावर समोर आला आहे. (हेही वाचा: Son of Sardaar 2: ब्रिटनचा व्हिसा न मिळाल्यामुळे संजय दत्तची 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटातून एक्झिट)
पहा व्हिडिओ-
Bollywood Super Star Padmashri @akshaykumar generously took the responsibility for a section of the renovation expenses, amounting to ₹1,21,00,000/- for the renovation work underway of Haji Ali Dargah. It was my honor as Managing Trustee with my entire team to welcomed the… pic.twitter.com/CDWKyKUrt1
— Suhail Khandwani (@syk_8282) August 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)