Akshay Kumar In Mahakal:  बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आज त्याच्या वाढदिवसानिमित्त महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला आला आहे. सोशल मीडियावर त्याला चाहत्याने भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अक्षय कुमार शनिवारी सकाळी भगवान महाकालच्या भस्म आरतीला उपस्थित राहण्यासाठी उज्जैनला पोहोचला. आज ते त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा करत असून त्यांनी महाकालचा दर्शन घेऊन ते आणखी खास केले आहे. शनिवारी सकाळी महाकालेश्वराच्या दरबारात होणाऱ्या भस्म आरतीला अक्षय त्याच्या कुटुंबासह उपस्थित होता. त्याने क्रिकेटपटू शिखर धवनसह भगवान महाकालच्या भस्म आरतीमध्ये भाग घेतला. अक्षयने भगवान महाकालच्या दरबारात समोर बसून भस्म आरतीमध्ये महाकालचे आशीर्वाद घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)