अभिनेता अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे. या खास दिवशी त्याने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. त्याने 'वेलकम 3' या चित्रपटाची घोषणा केली असून चित्रपटाचा टीझरही लाँच केला आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टमधील मुख्य 25 कलाकार टीझरमध्ये दिसत आहेत. पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

वेलकम टू द जंगलमध्ये अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश ऋषी, शारीब हाश्मी, इनामुल हक, झाकीर हुसैन, यशपाल शर्मा, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी आणि वृही कोडवारा हे कलाकार दिसणार आहेत.

पाहा टिझर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)