70th National Film Awards: आज, 8 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. विजेत्याच्या नावांची यादी ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आली होती. यावेळी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना या समारंभात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कला, संस्कृती, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिला जातो. देशातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वातंत्र्यानंतर याची सुरुवात झाली. चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळावे हाही या पुरस्कारांमागचा उद्देश होता.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1954 मध्ये सुरू झाले. त्यावेळी 1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या काही उत्कृष्ट चित्रपटांची निवड करण्यात आली. पहिल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णपदक 'श्यामची आई' या मराठी चित्रपटाला देण्यात आले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये, प्रत्येक श्रेणीच्या आधारे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात, जे रजत कमल, स्वर्ण कमल इत्यादी नावाने ओळखले जातात. काही पुरस्कारांमध्ये रोख पारितोषिकही दिले जाते, तर काही श्रेणींमध्ये केवळ पदक दिले जाते. (हेही वाचा: 'Jawan' to Release in Japan: अभिनेता शाहरुख खान याचा 'जवान' होणार जपानमध्ये रिलीज; चाहत्यांकडून वेगळीच मागणी)

पहा 70 व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी-

सर्वोत्कृष्ट चित्रपट– अट्टम

सर्वोत्कृष्ट अभिनेता– ऋषभ शेट्टी, कांतारा

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री– नित्या मेनन, तिरुचित्रबलम आणि मानसी पारेख, कच्छ एक्स्प्रेस

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक– सूरज बडजात्या, उंचाई

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री– नीना गुप्ता, उंचाई

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता– पवन मल्होत्रा, फौजी

सर्वोत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपट– कांतारा

सर्वोत्कृष्ट पदार्पण– प्रमोद कुमार

सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट– कार्तिकेय 2

सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट– पोन्नियिन सेल्वन– भाग 1

सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट– बाघी दी धी

सर्वोत्कृष्ट मल्ल्याळम चित्रपट– सौदी वेल्लाक्का

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट– वाळवी

सर्वोत्कृष्ट तिवा चित्रपट – सिक्यसाल

सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट– केजीएफ चॅप्टर 2

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट– गुलमोहर

सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट– काबेरी अंतरधन

सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट– इमुथी पुथी

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- प्रितम, ए आर रहेमान

सर्वोत्कृष्ट गायक– ब्रह्मास्त्र अरिजित सिंह

सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शनपट– केजीएफ चॅप्टर 2

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड चित्रपट– द कोकोनट ट्री

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)