जगातील आघाडीची अभियांत्रिकी कंपनी Rolls-Royce ने मोठ्या खर्चात कपात करण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर 2,500 हून अधिक लोकांना काढून टाकण्याची योजना जाहीर केली आहे. कंपनी जगभरात 42,000 लोकांना रोजगार देते व यामध्ये जवळजवळ निम्मे कर्मचारी यूकेमध्ये आहेत. जानेवारीमध्ये तुफान एर्गिनबिल्जिक हे कंपनीचे मुख्य कार्यकारी झाल्यानंतरचे त्यांचे हे मोठे पाऊल आहे. कोरोना महामारीच्या काळात एअरलाईन्स बंद पडल्यानंतर रोल्स रॉइसची आर्थिक कामगिरी घसरली होती, परंतु गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासात सुधारणा झाल्याने त्यात पुन्हा सुधारणा झाली आहे.

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीने लांब पल्ल्याच्या प्रवासावर लक्ष केंद्रित केले आहे, याचा अर्थ ती कमी पल्ल्याच्या विमानांसाठी इंजिन बनवणाऱ्या स्पर्धकांपेक्षा मागे पडली आहे. सध्या तरी Rolls-Royce ने नोकऱ्या कपातीबद्दल कोणतेही तपशील दिले नाहीत, परंतु अहवालानुसार, यूकेमध्ये शेकडो बॅक-ऑफिस नोकऱ्या प्रभावित होतील. जर्मनीमधील ऑपरेशन्सही वाईटरित्या प्रभावित होण्याची अपेक्षा आहे, जिथे कंपनी 11,000 लोकांना रोजगार देते. कंपनी डर्बीमध्ये 13,700, ब्रिस्टलमध्ये 3,400 लोकांना रोजगार देते आणि लँकेशायर, ग्लासगो, टायने अँड वेअर आणि रॉदरहॅममध्ये त्यांची लहान तळे आहेत. (हेही वाचा: Layoff 2023: फोर्डने 330 तर जनरल मोर्टासने 165 लोकांना कामावरुन काढून टाकले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)