OLA Electric Scooters: इलेक्ट्रिक वाहन (EV) उत्पादक कंपनी ‘ओला इलेक्ट्रिक’च्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कंपनीला नोटीस बजावली असून, आता अवजड उद्योग मंत्रालयाच्या वतीने ऑटोमोबाईल रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियानला कंपनीबाबतच्या तक्रारींची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती आणि कंपनीला 18 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले होते.
गेल्या एका वर्षात राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर ओलाबाबत 10 हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये डिलिव्हरीच्या 1900 तक्रारी होत्या आणि कंपनीने ज्या सेवा देण्याचा दावा केला होता ती सेवा दिली जात नसल्याबाबतच्या 1500 तक्रारी होत्या. यासोबतच ग्राहकांना सेवा मिळत नसल्याच्या तीन हजार तक्रारी कंपनीविरुद्ध होत्या. आता ओला इलेक्ट्रिकविरोधात सातत्याने येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला. (हेही वाचा: Ola Showroom Fire: कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये नाराज ग्राहकाने ईव्ही शोरूमला लावली आग; व्हिडिओ व्हायरल)
ओला इलेक्ट्रिकच्या अडचणीत वाढ-
The Ministry of Heavy Industries has directed the Automobile Research Association of India (ARAI) to investigate complaints filed against Ola Electric.
— ANI (@ANI) October 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)