Worms Found In Sandwich | (Photo Credits: instagram)

इंडिगो एअरलाईन्स (InterGlobe Aviation Limited) कंपनीच्या विमानातून प्रवास करताना एका महिलेला सँडविचमध्ये (Worm in Sandwich) चक्क अळी आढळून आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून महिलेने याबाबत माहिती दिली. त्यानंतर घडला प्रकार चर्चेत आला. सोशल मीडियावर नेटीझन्सनी तीव्र नापसंती व्यक्त केल्यानंतर कंपनीने महिलेला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे. महिलेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये ही अळीही स्पष्टपणे दिसत आहे.

महिलेची सोशल मीडियावर तक्रार

तक्रारदार महिलेने सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, घडल्या प्रकारबद्दल आपण तक्रार करणार आहोत. सँडविचमध्ये अळी असल्याची आणि तो सदोष असल्याचे माहिती असतानाही इंडिगो फ्लाईट कर्मचाऱ्यांनी आपणास हे सँडवीच दिले. विमानातून अनेक महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि रुग्णही प्रवास करतात. त्यांना जर अशा प्रकारचे अन्न मिळाले तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. महिलेने असेही म्हटले आहे की, की तिला कोणत्याही नुकसान भरपाईची किंवा परताव्याची अपेक्षा नाही. फक्त एक आश्वासन हवे की प्रवाशांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही तुमची सर्वोच्च प्राथमिकता असावी.  (हेही वाचा, Shrimp Cooks In Plane Bathroom: विमानाच्या टॉयलेटमध्ये शिजवली कोळंबी, Video व्हायरल)

प्रवाशांच्या आरोग्याविषयी प्रश्नचिन्ह

सोशल मीडियावर महिलेने आपली भावना व्यक्त करत म्हटले आहे की, मी लवकरच ईमेलद्वारे अधिकृत तक्रार नोंदवणार आहे. परंतु एक सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक म्हणून मला हे जाणून घ्यायचे आहे की सँडविचचा दर्जा चांगला नव्हता आणि फ्लाइट अटेंडंटला तिच्या अगोदर माहिती दिली होती. तरीही इतर प्रवाशांना सँडविच देणे सुरू ठेवले. त्यात लहान मुले, वृद्ध आणि इतर प्रवासी होते.... कोणाला संसर्ग झाला तर? (हेही वाचा, Live Snail in Salad: फूड डिलिव्हरी अॅप स्विगी द्वारे ऑर्डर केलेल्या सॅलडमध्ये आढळली जिवंत गोगलगाय; व्हिडिओ व्हायरल, कंपनीने दिली 'ही' प्रतिक्रिया (Watch))

इंडिगो एअरलाइन्सकडून अधिकृत निवेदन

इंडिगो एअरलाइन्सने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत प्रवाशांची चिंता मान्य केली आणि माफी मागितली आहे. एअरलाइनने स्पष्ट केले की हे प्रकरण सध्या तपासाधीन आहे. विमान कंपनीने म्हटले आहे की, आमच्या एका ग्राहकाने दिल्ली ते मुंबई या फ्लाइट 6E 6107 मधील त्यांच्या अनुभवाबाबत उपस्थित केलेल्या चिंतेची आम्हाला जाणीव आहे. आम्ही विमानातील अन्न आणि पेय सेवेची सर्वोच्च मानके राखण्यासाठी आमच्या अटूट बांधिलकीवर ठाम आहोत. आम्ही या प्रकणाचा तपासकरुन आवश्यक ती काळजी यापुढे घेऊ.

इन्स्टा पोस्ट

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Dietitian Kushboo Gupta | Mindful Eating Coach (@little__curves)

या आधीही वेगवेगल्या विमान कंपन्यांच्या विमानामध्ये अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. अनेकदा विमानामध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न मिळाल्याच्या तक्रारी प्रवाशांनी यापूर्वी केल्या आहेत. या तक्रारी आल्यानंतर सदर विमान कंपन्यांनी प्रवाशांची माफी मागूण गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलची आपली बांधीलकी कायम असल्याची ग्वाहीही दिली आहे.