Women Constable Viral Photo: महिला पोलिस कर्मचाऱ्याने जिंकले मन; वृद्ध महिलेला 5 किलोमीटर खांद्यावर उचलून घेऊन पोहोचवले घरी
Women Constable Viral Photo (PC - Twitter)

Women Constable Viral Photo: गुजरातमधील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने मानवतेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. वाळवंटातील कडाक्याच्या उन्हात एका वृद्ध महिलेला खांद्यावर 5 किलोमीटर उचलून घरी नेण्याचे काम एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने केले आहे. ही वृद्ध महिला गुजरातमधील कच्छमधील एका मंदिरात मोरारीबापूंची कथा ऐकण्यासाठी आली होती. यादरम्यान उन्हामुळे ती बेशुद्ध झाली होती.

यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने माणुसकीचे अनोखे उदाहरण मांडत वृद्ध महिलेला मदत केली आणि कडक उन्हात तिच्या खांद्यावर 5 किलोमीटर उचलून महिलेला सुखरूप घरी पोहोचवले. या महिला पोलिसांचे देशभरातून कौतुक होत आहे. खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी ट्विट करून या महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कामाचे कौतुक केले आहे. (हेही वाचा - 11 Year Old Boy Hide in Fridge: वादळाचा सामना करण्यासाठी 20 तास फ्रिजमध्ये बसला 11 वर्षाचा मुलगा; पुढे काय घडलं, जाणून घ्या)

प्राप्त माहितीनुसार, कच्छच्या खदिर बेटावर असलेल्या भांजदादाच्या मंदिरात मोरारीबापूंची रामकथा सुरू होती. एक 86 वर्षीय महिला रामाची कथा ऐकण्यासाठी डोंगरावर चढत होती. यादरम्यान तिला उष्णता सहन न झाल्याने ती बेशुद्ध पडली. ही बाब महिला कॉन्स्टेबल वर्षा बेन परमार यांना समजताच त्यांनी तातडीने वृद्ध महिलेकडे मदतीसाठी धाव घेतली. महिलेला खांद्यावर उचलले. यानंतर कडक उन्हात 5 किमी चालत महिलेला तिच्या घरी नेले.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी महिला पोलिसाचे कौतुक करत 'खाकीची मानवता' असे ट्विट केले आहे. कच्छमधील रापर येथे मोरारीबापूजींची कथा ऐकण्यासाठी पायी निघालेल्या 86 वर्षीय व्यक्तीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे महिला पोलीस अधिकारी वर्षाबेन परमार यांनी खांद्यावर घेऊन 5 किमी चालत सेवेचा उत्कृष्ट नमुना ठेवला आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्याला मदत केल्यानंतर वृद्ध महिलेने तिला मनापासून आशीर्वाद दिला.