Viral Video: साडीत Back Flip मारत जबरदस्त स्टंट्स करणा-या महिलेचा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, नक्की पाहा
Woman Backflip Viral Video (Photo Credits: Instagram)

'सोशल मिडिया' (Social Media) हे सध्या लोकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे असे म्हटले तरी काही वावगं ठरणार नाही. यावर व्हायरल होणारे व्हिडिओज सोशल मिडियावर प्रचंड चर्चेत असतात. यावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यात एक महिला चक्क साडीमध्ये सलग 3-4 बॅकफ्लिप (Backflip) मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून कुणाचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. सध्याच्या काळात साडी नेसून प्रवास करणे वा वावरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते तिथे ही महिला बिनधास्तपणे साडीत बॅकफ्लिप मारताना दिसत आहे.

तिच्या या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचा अश्लीलपणा दिसत नसून उलट तिचे कौतुक करावे असाच हा व्हिडिओ आहे. या महिलेचे इन्स्टाग्रामवरील नाव मिली सरकार आहे. हा व्हिडिओ तिने 20 नोव्हेंबरला तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. ज्यात ती एका लाल साडीमध्ये सलग बॅक फ्लिप मारताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Coin Removed From Nose After 50 Years: तब्बल 50 वर्षानंतर व्यक्तीच्या डाव्या नाकपुडीतून काढले नाणे, पहा हैराण करणारा व्हिडिओ

पाहा व्हायरल व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by mili (@milisarkar72)

हा व्हिडिओ ट्विटरवर एका युजरने शेअर केल्यानंतर अनेकांनी या महिलेचे कौतुक केले. ही महिला सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. तिचे इन्स्टाग्रामवर 13 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

तिने साडीमध्ये न केवळ ब्लॅकफ्लिप तर कार्टव्हिल हा पाश्चिमात्य नृत्यातील एक प्रकार देखील केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.