अजबच ! अंगावर आठ जीन्स पॅन्ट चढवून तरुणी काढणार होती पळ; सीसीटीव्हीमुळे कसा फसला प्लॅन तुम्हीच पहा (Watch Video)
Woman steals 8 jeans from shop (Photo Credits: Info - Viral - Fun YouTube)

असं म्हणतात आपण जिथवर विचार करू शकतो त्याच्या पलीकडे जाऊन चोरांची बुद्धी काम करत असते. याच वाक्याची सार्थ पटवणारी एक व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. या क्लिप मध्ये एक तरुणी आपल्या अंगावर चक्क एकावर एक आठ जीन्स चढवून दुकानातून पळ काढण्याच्या प्रयत्नात असल्याचा अंदाज येतो, मात्र या तरुणीवर संशय आल्याने दुकानातील सुरक्षारक्षकांनी तिला अडवले आणि तिची तपासणी केली. तिचा तपास करत असताना तिने स्वतःच आपल्या अंगावरून एका मागोमाग एक अशा आठ जीन्स काढून दाखवल्या. हा व्हिडीओ पेरू (Peru) या देशातील असून अद्याप या तरुणीची ओळख सांगण्यात आलेली नाही.

या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता, की ही तरुणी बाथरूम मध्ये या आठ जीन्स काढून दाखवत आहे. आठ जीन्स काढून झाल्यावर ती अक्षरशः स्वतःचे अंतर्वस्त्र दुकानातील तपासकला दाखवते.

कपडे न घालता रेसिपी शिकवणारी 'ही' युट्युबर शेफ ठरतेय चर्चेचा विषय; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? (Watch Video)

आठ जीन्स अंगावरून काढताना तरुणीचा व्हिडीओ

दरम्यान, हा व्हिडीओ जरी व्हायरल होत असला तरी अद्याप या तरुणीला अटक केल्याचे सांगण्यात आलेले नाही. तर व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करताना दुकानदारांनी अशा प्रकारे या तरुणीचा व्हिडीओ पोस्ट करण्याची गरज नव्हती असे म्हंटले आहे.