Viral Video: डोक्यावर भांडी, दोन्ही हातात सामान असतानाही एका महिलेने चक्क पाण्यातून चालवली बाईक, पाहा व्हिडिओ
Viral Video (Photo Credits: Twitter)

सोशल मीडिया (Social Media) ही आजच्या आधुनिक जगातील सगळ्यांना परिचित असलेली कालानुरूप संकल्पना बनली आहे. आज लहानथोरांपासून प्रत्येकाच्या जीवनाचा सोशल मीडिया हा अपरिहार्य भाग आहे. फेसबुक, ट्विटर वा इन्स्टाग्रामने आज प्रत्येकाचे दैनंदिन आयुष्यच बदलून टाकले आहे. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ शेअर होत असतात आणि धूमाकूळ घालतात. नुकताच डॉ अजयिता नावाच्या ट्विटर युजरने एका महिलेची अद्भुत प्रतिभा दाखविणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओत एक महिला डोक्यावर भांडी आणि दोन्ही हातात सामान असतानाही चक्क पाण्यातून बाईक चालवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण त्या महिलेच्या टॅलेन्टचे कौतूक करत आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'तिच्याकडे अनेक कलागुण आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ 41 सेकंदाचा आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आहे. या व्हिडिओतील महिलेच्या संतुलित प्रतिभेने नेटकरी प्रभावित झाले आहेत. काही वापरकर्त्यांनी अशी टिप्पणी देखील केली की महिला काहीही करू शकतात, तर काहींनी त्यास महिला सबलीकरणाचे एक अद्भुत उदाहरण म्हटले आहे. हे देखील वाचा- Kamasutra 3D चित्रपटामधील अभिनेत्री Aabha Paul हिच्या Bold Photos ने सोशल मीडियावर लावली आग, शेवटचा फोटो पाहून व्हाल दंग

ट्वीट-

या महिलेचा टॅलेन्ट पाहून इंटरनेटवरील लोक खूप प्रभावित झाले आहेत. या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने त्या महिलेला वंडर वूमन म्हटले आहे. तर, एका वापरकर्त्याने लिहिले की, 'आजपर्यंत मी कधीही कोणत्या माणसाला असे करताना पाहिले नाही. त्याचवेळी दुसर्‍या वापरकर्त्याने तिला 'सुपर वूमन' असल्याचे म्हटले आहे.