Fish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं?
FIsh Pedicure (Photo Credits: Facebook)

आपल्या हातापायाची काळजी घेण्यासाठी अनेकजण Manicure आणि Pedicure पद्धतीचा मार्ग अवलंबतात, त्यातही नैसर्गिक प्रसाधनांच्या वापराकडे लोकांचा कल असतो. ही आवड लक्षात घेऊन अलीकडे Fish Pedicure ही ट्रीटमेंट तयार करण्यात आली आहे. यामध्ये काही छोटे मासे टब मध्ये ठेवून त्यात पाय टाकायचे असतात, ज्यानंतर हे मासे आपल्या पायावरील मळ खाऊन साफ करतात, खरतर हा अनुभव नक्कीच घेण्यासारखा आहे, मात्र या ट्रीटमेंट दरम्यान खबरदारी न घेतल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो, अलीकडे असाच काहीसा प्रकार थायलँड (Thailand) मध्ये समोर आला आहे. ज्यामध्ये एका महिलेला हे पेडिक्योर करणे चांगलेच महागात पडले आहे, तिला या ट्रीटमेंट नंतर चक्क आपल्या पायाची बोटंच कापून टाकायला लागली आहेत. पावसाळ्यात पायांना भेगा पडल्यास करा 'हे' सोपे उपाय 

नेमकं घडलं काय?

2006 मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये राहणाऱ्या व्हिक्टोरिया नामक महिलेला पायाच्या बोटांच्या हाडांना संसर्ग झाला होता. त्यानंतर 2010 मध्ये ती थायलँड मध्ये एका सहलीसाठी गेली होती, जिथे तिने फिश स्पा घेतला. या ट्रीटमेंटची सुरुवात थायलँड मध्ये झाल्याचे म्हंटले जाते त्यामुळे इथे गेल्यावर हा अनुभव घेणे हे अनेकांच्या लिस्ट मध्ये असतेच, मात्र व्हीकटोरियाने ज्याठिकाणी हा स्पा घेतला तिथले पाणी हे अगदी दूषित होते, शिवाय अगोदरच तिच्या बोटांच्या हाडांना संसर्ग असल्याने तिला या पाण्याचा अधिकच त्रास झाला. ही ट्रीटमेंट घेतल्यावर जेव्हा ही महिला घरी परतली तेव्हा तिला खूप ताप येऊ लागला. याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेतला असता त्यांनी सुद्धा हा ताप संसर्गातून झाल्याचे म्हंटले, या महिलेवर दोन वर्ष सलग उपचार सुरु होते मात्र अखेरीस नाईलाजाने डॉक्टरांनी तिच्या उजव्या पायाचा अंगठा आणि बोटं कापून टाकण्याचा निर्णय घेतला.(हेही वाचा-पायांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी सोपे उपाय!)

दरम्यान महिलेने या घटनेसाठी स्पाच्या मालकांना जबाबदार म्हंटले आहे, दूषित पाण्याच्या बाबत स्पा ने केलेल्या हलगर्जीपणामुळे आपल्याला ही इतका मोठा भुर्दंड बसला असाही आरोप व्हीकटोरियाने लावला आहे. प्रत्यक्षात फिश पेडिक्योर मुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जखमा बऱ्या व्हायला मदत होते मात्र अशा वेळी जर पाण्याची किंवा प्रसाधनांची काळजी घेतली नाही तर अशा प्रकारे दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो.