म्हटलं तर गंभीर, म्हटलं तर मजेशीर आणि म्हटलं तर धक्कादायकसुद्धा, अशी ही घटना आहे. जॉगींग करणाऱ्या महिलेच्या पाठी एक कुत्रा (Dog) धावला. त्या कुत्र्याच्या पाठी त्याचा मालक पळाला. या पळापळीनंतर झालेल्या वादावादीत कुत्रा नव्हे, चक्क कुत्र्याचा मालकच त्या महिलेला चावला. या घटनेत महिला जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तर, पोलिसांनी आरोपीला अटक केरुन त्याची रवानगी तुरुंगात केली आहे. ही घटना अमेरिका (America) येथील कॅलिफॉर्निया (California) येथे घडली. प्राप्त माहितीनुसार जॉगींग करणाऱ्या महिलेने कुत्र्याकडून होणारा पाटलाग थांबविण्यासाठी आणि त्याच्या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कुत्र्यावर पेपर स्प्रे फवारला.
दरम्यान, पीडित महिला कुत्र्यावर पेपर स्प्रे फवारत असताना कुत्र्याचा मालकही धवत तेथे आला. कुत्र्यावर पेपर स्प्रे फवारल्याबद्दल कुत्र्याचा मालक आणि पीडित महिला यांच्यात वाद निर्माण झाला. याचे पर्यावसन हाणामारीत झाली. कुत्र्याच्या मालकाने पीडित महिलेला मारहाण केली. तो केवळ मारहाण करुनच थांबला नाही. तर, त्याने चक्क पीडितेला कडाडून चावाही घेतला. या घटनेत पीडिता गंभीर जखमी झाली. हल्ला करणाऱ्या कुत्र्याच्या मालकाचे नाव अलमा काडवालाडर अशी सांगण्यात येत आहे. तो 19 वर्षे वयाचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीला पोलिसांनी अटक करुन त्याची रवानगी डबलिंग येथील सँटा रीटा जेलमध्ये करण्यात आली आहे. (हेही वाचा, Viral Video: गाणारी गाढवीन तुम्ही कधी पाहिली आहे का?)
ही घटना कॅलिफॉर्नियातील ऑकलँड रीजनल पार्क परिसरात घडली. पीडित महिलेला कुत्रा नव्हे तर, कुत्र्याचा मालक चावल्याच्या घटनेची पोलिसांनीही पुष्टी केली आहे. चावा घेतल्यानंतर आरोपीने पीडितेला लाता-बुक्क्यांनीही मारहाणकेली. सध्या तो तुरुंगात आहे. सोशल मीडियावर हे वृत्त व्हायरल झाले आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी सोशल मीडयातून नेटकरी करत आहेत.